साडेतीन वर्षांपूर्वी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांवर झाला होता हल्ला
प्रतिनिधी/मिरज
मिरज तालुक्यातील वड्डी येथे कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पाच महिला आरोपींना सहा महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली. तीन वर्षांपूर्वी संबंधीत महिलांनी जमाव करुन पोलिसांवर हल्ला करत शासकीय कामात अडथळा आणला होता.
साध्या कैदेची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये रेखा जगेश उर्फ कलियुग भोसले, छायाक्का सुनिल भोसले, जानकी गौडा भोसले, मनीषा पाटील भोसले आणि छोटा उर्फ छाया ऋषीकेश पवार या पाच महिलांचा समावेश आहे.