मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजूरीजवळ दोन मोटारसायकलची समोरा- समोर भीषण धडकेत एक जण जागीच ठार झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले यातील एकाची प्रकृती गंभीर आहे . गावातील सलून व्यवसायिक लक्ष्मण भाऊसो काळे ( वय54 ) हे रस्त्यावर उडून पडल्याने जागीच ठार झाले.
मणेराजूरी बसस्थानक चौकात सलून व्यवसाय करणारे लक्ष्मण भाऊसो काळे व निवास शिंदे हे सांगली रोडवरून गावाकडे येत होते ;काळे वस्तीजवळ येताच त्याच वेळी मणेराजूरीहून बुधगावकडे जाणारे ताडी व्यवसायीक मोटारसायकलवरून जात होते ;दोन्ही मोटारसायकली समोरासमोर येताच जोराची धडक झाली यात दोन्ही गाडयावरील चौघजण उडून डांबरीवर पडले यामध्ये लक्ष्मण काळे जागीच ठार झाले तर बुधगावमधील दोघेजण गंभीर जखमी झाले यातील एकाची ( नाव समजू शकले नाही ) प्रकृती गंभीर आहे. याना तातडीने तासगाव ग्रामीण रुग्णालयातून सांगली सिव्हीलला भरती करणेत आले आहे . घटनास्थळी तासगाव पोलीसांनी पंचनामा केला आहे .
मणेराजूरी बसस्थानक चौकात सलून दुकान चालविणारे लक्ष्मण काळे हे हरहुन्नरी मनमिळावू व्यक्तिमहत्व होते; त्यांच्या अपघाती जाण्याने बसस्थानक चौक व परिसराला धक्का बसला .