शिराळा: वार्ताहर
बिऊर ( ता.शिराळा ) येथील श्री गोरक्षनाथ मंदिर फाट्यावर तीन मोटारसायकल व चारचाकी गाडी यांच्यात धडक होऊन एक जण जागेवरच ठार झाला.तर पाच जण जखमी झाले आहेत.भारत भिवाजी ढवारे (वय ३५ , ढोकी , जि. उस्मानाबाद ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघातातील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.सदर घटना आज बुधवार दि.२५ रोजी सायंकाळी साडेसहा च्या दरम्यान घडली.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की , चारचाकी अल्टो गाडी (क्रमांक एम एच २३ ई ६१२५ ) ही गाडी सागाव कडून शिराळा कडे येत असता शिराळा बाह्य वळण रस्त्यावर मोटारसायकल वरून ( क्रमांक एम एच०४ बी आर ८५४६) बिऊर कडून शिराळा कडे येत असताना यांची धडक झाली . यामध्ये भारत भिवाजी ढवारे हे जागेवरच मयत झाले.सदर अल्टो गाडीची धडकेनंतर याच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकलना ( क्रमांक एम एच१० – सि ए १०२० व एम एच १० सि डी ७३०७ ) धडक बसली .तसेच या चौकातील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तिघांना धडक दिली.
यामध्ये रस्त्याकडेला उभा असलेले बाबुराव दत्तू देसाई (वय ४९) , दिनकर दत्तू देसाई ( वय ५७ , दोघे रा.भाटशिरगाव ) , डॉ. सयाजी किसन शिंदे (५६ नाटोली ) तर मोटारसायकल वरील महादेव भीमराव सपाटे ( वय ३२ , रा.कांदे) , विशाल अंकुश साळुंखे ( २७ , मांगले) हे जखमी झाले आहेत. यापैकी महादेव सपाटे , सयाजी शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी साठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत भारत ढवारे यांचे पश्चात पत्नी , एक मुलगी ,आई , वडील , पाच बहिणी असा परिवार आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश वाडेकर करत आहेत.