500 किलो मांस जप्त
सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील साठेनगर मधील जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर शुक्रवारी रात्री आष्टा पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने छापा टाकला. यावेळी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्याकडून 500 किलो मास आणि लहान जनावरांची 53 मुंडके, रक्त कातडी अन्य अवयव आणि हत्यारे जप्त केले आहे.
साठेनगर मध्ये जनावरांचा बेकायदेशीर कत्तलखाना सुरू असल्याची माहिती प्राणी कल्याण अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या कत्तलखान्यावर शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी या ठिकाणी संशयित सुधीर घस्ते यांच्या घरात हातात सत्तूर व सुरेख घेऊन जनावरांचे मास तोडत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडील जनावरांचे 500 किलो मास, गाईंच्या वासराची सहा आणि म्हशीच्या रेडकांची आठ अशी लहान जनावरांची एकूण 53 मुंडके चामडे जनावरे कापण्याचे हत्यारे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या संशयता विरोधात महाराष्ट्र प्राणी अधिनियम गुन्हा दाखल केला आहे.. या प्रकरणाचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.