“तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीटरद्वारे मारण्याची धमकी देण्यात आली असतानाच शिवसेना- ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत जिविताची धमकी देण्यात आली आहे. संजय राउतांनी सकाळची पत्रकार परिषद बंद करावी नाहीतर त्यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे.
याबाबतची माहीती देताना आमदार सुनिल राऊत म्हणाले; “गुरूवारी ८ जून रोजी ४ ते ४.१५ च्या दरम्यान मला 3 ते 4 फोन आले. त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली. या महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू. सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू,” असे यांनी सांगितलं.
शिंदे- फडणवीस सरकारवर टिका करताना आमदार सुनिल राऊत म्हणाले, “गेले अनेक दिवस अशाप्रकारच्या धमक्या येत असून आम्ही सरकारला त्याची जाणीव करून दिली आहे. पण, सध्याचे सरकार याबाबत कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते संजय राऊतांना संपवण्याची सुपारी सरकारने घेतली आहे.” असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. ते एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.