ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी ऑन कॅमेरा ‘थू’ असं म्हणत थुंकल्याची कृती केली.
कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या परदेशवारीवरून टीका केली होती. याबद्दल पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावेळी राऊतांनी प्रश्न ऐकूण घेत असताना कोणं असं विचारले आणि पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव सांगताच त्यांनी कॅमेऱ्यासमोर बाजूला झुकून ‘थू’ असं केलं. त्यानंतर पत्रकारांनी श्रीकांत शिंदेचा प्रश्न तिथेच संपवला.
काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?
उद्धव ठाकरेंना राज्यातली उष्णता सहन होत नसेल म्हणून ते परदेशात गेले असतील. ज्यांच्या नावावर राजकारण केलं, मतं मागितली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळय़ाला तरी ते येणार आहेत का? पण ज्याठिकाणी ते गेले आहेत तिथल्या राज्याचा नुकताच राज्याभिषेक झाला आहे, त्यांना तरी भेटायला जावू नये, असं श्रीकांत शिंदे म्हणाले होते.