ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
प्रतिनिधी/ पणजी
धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना चालविण्यासाठी सरकार खासगी कंपनीला (पीपीपी) सहभागी करून घेणार आहे. हा कारखाना बंद पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
त्याचबरोबर या कारखान्याच्या परिसरात कोणत्याही खासगी कंपनीला इथेनॉल प्रकल्प उभारण्यास देणार नाही, असेही सावंत यांनी सांगितले. सांगे येथील शेतक्रयांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. त्याही पलीकडे जाताना स्वत: शेतकऱ्यांनीच प्रकल्प चालवण्याची जबाबदारी स्वीकारल्यास त्यांना सर्वतोपरी सरकारी मदत करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.