सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे प्रतिपादन : श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या शैक्षणिक भवनाचे लोकार्पण
कुंडई : संस्कार सहितं विद्या। श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या शैक्षणिक भवनाचं उद्घाटन झालेलं आहे. तपोभूमीच्या या शैक्षणिक भवनातून संस्कार पूर्ण शिक्षण पद्धती, गुऊकुल पद्धती लोकाभिमुख होणार आहे. ऋषिमुनींनी आपली संस्कृती विरासत रूपाने आम्हाला दिलेली आहे. आम्ही त्यांचे पायिक आहोत. भारत ऋषिमुनींचा देश, प्राचीनतम देश ज्याने या गुऊकुल शिक्षण पद्धतीचा मूळ पाया रचला. आपला देश सर्व विद्यांनी संपन्न होता. सगळ्dया प्रकराची ऐश्वर्य संपन्नता आमच्या देशात होती. पुन्हा ही संपदा आपल्याला उभी करायची असेल तर ऋषिमुनींच्या विचारांनी युक्त मुलांना तयार करावं लागेल, असे संबोधन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुऊ ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले. श्री क्षेत्र तपोभूमी गुऊपीठावर दि. 1 जून रोजी श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या शैक्षणिक भवनाचा लोकार्पण सोहळा पूज्य स्वामीजींच्या पावन उपस्थितीत व करमलांद्वारे संपन्न झाला. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करीत होते. पूज्य स्वामीजी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नवीन शिक्षा प्रणालीच्या माध्यमातून हेच काम करू पाहत आहेत. त्यांनी सुद्धा जाणलं की संस्कार सहितं विद्या हा शिक्षणाचा मूळ गाभा, आधार आहे. जर आपली मुलं राष्ट्राभिमानी, विद्याव्यासंगी व्हायची असेल उत्तम संस्कार शिक्षणावर लक्ष केंद्रीत करा. शिक्षणाने बुद्धी तयार होते आणि बुद्धी बरोबर हृदय घडतं. त्यामुळे हृदय घडविणारं शिक्षण मुलांना देण्याची आवश्यकता आहे, असे ही उद्बोधन पूज्य स्वामीजींनी केले. इंटरनॅशनल सद्गुऊ गुऊकुलम्, स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय, सद्गुऊ ज्ञानपीठ, स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुऊकुल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थांसाठी या शैक्षणिक भवनाच्या संकुलाचा वापर करण्यात येणार आहे. या भवनातील प्रति एक कक्षेसाठी दान दिलेल्या भाग्यवान धनिकांच्या नामफलकाचे उद्घाटन व दात्यांचा गौरव पूज्य स्वामीजींच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी गोवा उच्च माध्यमिक शिक्षण विभाग – सहसंचालिका भक्ति नाईक, श्री दत्त पद्मनाभ पीठ – संचालक प्रा. रामचंद्र नाईक, श्री दत्त पद्मनाभ पीठ – प्रबंधक विनोद नाईक, माधव खानोळकर आदी उपस्थित होते.