क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
क्रीडा खात्याने आयोजित केलेल्या बार्देश तालुका आंतर शालेय 14 व 17 वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत खोर्लीतील सारस्वत विद्यालयाने जेतेपदे मिळविली. या स्पर्धेचे आयोजन पेडे येथील इनडोअर सभागृहात झाले.
या स्पर्धेतील उपविजेतेपद म्हापसाच्या जी. एस. आमोणकर विद्यामंदीरला प्राप्त झाले. 14 वर्षांखालील विभागात सारस्वत विद्यालयाचे प्रतिनिधीत्व तेजम बर्डे, पार्थ गोवेकर, अद्विक कळंगूटकर, शुभ नाईक व समर्थ धुळापकर यांनी केले. 17 वर्षांखालील मुलांच्या विभागातही सारस्वत विद्यालयाने जेतेपद मिळविले. या विभागातही जी. एस. आमोणकर विद्यामंदीरचा संघ उपविजेता ठरला. इशान जोशी, श्लोक धुळापकर, रुदाक्ष हडफडकर, सहंज नाईक व राघव लाड या खेळाडूंचा विजेत्या सारस्वत विद्यालयाच्या संघात समावेश होता. या स्पर्धेत नीलेश धारगळकरने आर्बिटर म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन बार्देश तालुका क्रीडा अधिकारी रामोना डिसोझा यांच्या देखरेखेखाली झाले.