सांखळी : वेळगे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 5 साठी 307 पैकी 249 मतदान झाले. त्यात 130 महिला तर 119 पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी झाली. यामध्ये सर्वेश घाडी 138 मते मिळाल्याने ते विजयी झाले. महेश गवंडे यांना 36, साक्षी प्रीयोळकर यांना 74 मते प्राप्त झाली. तर एक मत बाद म्हणून घोषित करण्यात आले. नवनिर्वाचित सदस्य सर्वेश घाडी यांचे सरपंच सामंता कामत यांनी पंचायत कार्यालयात स्वागत व अभिनंदन केले. यावेळी उपसरपंच लवू आमडकर, पंच सर्वेश मुळगावकर, योगिता हळदणकर, स्वेता गावकर यांची उपस्थिती होती.
Next Article आयटकतर्फे आझाद मैदानावर निदर्शने
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.