खेड / प्रतिनिधी
शहरातील डाकबंगला परिसरातील भंगार गोडावूनमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या स्फोटात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. छोटू (रा.उत्तरपदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. जखमी झालेल्या कामगारास उपचारार्थ तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. भंगार गोडावूनमध्ये ड्रम गॅस वेल्डींगने कट करत असताना ड्रममध्ये गॅस तयार होवून अचानक स्फोट झाला. लोकवस्तीतच घडलेल्या या स्फोटाने एकच खळबळ उडाली आहे.