अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 17 एप्रिल 2022, दुपारी 12.10
● शनिवारी दिवसभरात 188 जणांची स्वॅब तपासणी
● 0.53 वर पॉझिटीव्हीटी
● कोरोनामुक्ती आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण समानच
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्याचा कोरोनाचा अहवाल रविवारी सकाळी आरोग्य विभागाने जाहीर केला. त्यामध्ये नव्याने एकजण बाधित आढळला असून, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 2 लाख 79 हजार 226 वर पोहचली आहे. शनिवारी दिवसभरात 188 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत स्वॅब तपासणी केल्याची संख्या 25 लाख 75 हजार 844 वर पोहचलेली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 0.53 वर आला आहे. दरम्यान, कोरोनामुक्ती आणि सक्रीय रुग्ण संख्या यांचे प्रमाण समानच राहिलेले आहे.
जिल्ह्यात नव्याने एकजण बाधित
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये कोरोनाचे नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. सर्वच तालुक्यामध्ये शुन्य कायम राखण्यामध्ये चढाओढ सुरु आहे. दररोज एखादा दुसरा रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. तोही रुग्ण ठणठणीत बरा होत आहे. शनिवारी दिवसभरात 188 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकजण केवळ कोरोना बाधित आढळून आला. नव्याने होणारी बाधित वाढ ही आता थांबवण्यात यश आलेले आहे. आरोग्य विभाग मोठी मेहनत घेत असून गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूदर पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आलेला आहे. नव्याने एकच जण जिल्ह्यात बाधित आढळून आलेला आहे. त्यामुळे बाधित संख्या आतापर्यंतची 2 लाख 79 हजार 226 वर पोहचली आहे.
सक्रीय रुग्ण आणि बाधित रुग्ण प्रमाण समानच
जिल्ह्यात दररोज नव्याने आढळून येणारे रुग्ण हे हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच आहेत. त्याही रुग्णावर चांगले उपचार करुन त्यांना बरे करण्यात येत आहे. जिल्ह्यात तेवढेच कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळे सक्रीय रुग्ण शनिवारी चार होते तर कोरोनामुक्त 3 जण झाले होते. आतापर्यंत 2 लाख 71 हजार 845 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचा वेग हा नव्याने आढळून येणाऱ्यांपेक्षा चांगला आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा 97.36 वर आलेला आहे. तर पॉझिटीव्हीटी रेट हा 0.53 वर आलेला आहे.
रविवारी
नमूने-188
बाधित-01
रविवारपर्यंत
नमूने-25,75,844
बाधित – 2,79,226
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,845