पालिका आणि प्रदुषण नियंत्रण महामंडळाडून रेस्टाँरंट पुलाखालील मूर्तीकारावर कारवाई
सातारा: सातारा शहरात काही कंपन्यांकडून, व्यावसायिकांकडून प्रदुषणाची नियमावली मोडली जाते. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार होत असतो. त्याबाबत पर्यावरण प्रेमींकडून अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत. परंतु त्यावर कार्यवाही करायला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंहळाला वेळ नसून पीओपीच्या नावाखाली दोन दिवसांपूर्वी बॉम्बे रेस्टाँरंट पुलाखाली असलेल्या मूर्तीकारांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सातारा पालिकेचा अतिक्रमण हटाव विभागाला फक्त आदेशाच बाकी असतो. वरीष्ठांनी आदेश दिला की हे पथक गाडी घेऊन कारवाईला पुढे असते. राज्य शासनाच्या आलेल्या नियमावलीनुसार साताऱ्यातील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ आणि पालिका प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वी पीओपींच्या कारणास्तव मुर्तीकारांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यावेळी कारवाईस आलेल्या पथकाकडून सक्त ताकिद दिली गेली आहे.
हेही वाचा- Satara Crime: दहशत माजवणारे बकासूर गँगचे 6 जण जेरबंद
दरम्यान, त्या मूर्तीकारांनी आम्ही नियम पाळू अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, सातारा शहरात अनेक व्यावसायिक असे आहेत की त्यांच्याकडून प्रदुषणाबाबत नियमावलीचे उल्लघंन केले जाते. कॉलव्यात पाणी सोडून दिले जाते. त्याबाबत अनेकदा सामाजिक संघटनांनी तक्रारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडून कार्यवाही होत नाही. त्यावर अगोदर कार्यवाही करण्यात यावी, नंतर गरिबांच्या व्यवसायाकडे वळावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.