प्रतिनिधी/ सातारा
सातारच्या पोलीस कवायत मैदान, सैनिक स्कुल आणि शाहू क्रीडा संकुल येथे 48 वी कोल्हापूर विभागीय स्पर्धेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते झाला. पहिल्याच दिवशी सातारा जिह्याने गोळा फेक महिला, थाळी फेक महिला आणि वेट लिफ्टिंग पुरुष गटात पहिला क्रमांक पटकावला. तर कोल्हापूर, सोलापूरच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
पोलीस विभागाची 48 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धा सातारा येथील पोलीस कवायत मैदान, सैनिक स्कुल आणि शाहू क्रीडा संकुल येथे सुरू झाली. या स्पर्धेचे शानदार उद्घाटन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांच्यासह जिह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेत महिला व पुरुष गटाच्या अथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल आदी 14 प्रकारचे खेळ होत असून प्रत्येक क्रीडा प्रकारात वैयक्तिक व सांघिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण, शहर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण अशा सहा पोलीस घटकातील 1200 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. दरम्यान पहिल्या दिवशी गोळा फेक आणि थाळी फेक मध्ये सुरुवातीला पुरुष गटात सातारा आघाडीवर होता. मात्र थाळी फेक मध्ये सोलापूर ग्रामीणने बाजी मारली आणि सातायाला दुस्रया क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात गोळा फेक मध्ये कोल्हापूरने प्रथम क्रमांक पटवकाला आणि दुस्रया क्रमांकावर सांगली जिल्हा राहिला. महिलांच्यामध्ये गोळा फेक मध्ये सातारने प्रथम तर सोलापूर ग्रामीणने द्वितीय क्रमांक पटवकाला. थाळी फेक मध्ये महिला मध्ये सातारा प्रथम आणि दुसरा क्रमांक ही सातारच्या खेळाडूचा आला. वेट लिफ्टिंग पुरुष गटात सातारा जिल्हा प्रथम आला तर दुसरा क्रमांक सोलापूर ग्रामीणचा आला.