कर्नाटक राज्यात सत्ता स्थापित केलेल्या काँग्रेस सरकारने जिल्हा पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यात बेळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना जिल्हा पालकमंत्री पद मिळाले आहे.बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांना जबाबदारी देण्यात आली असून लक्ष्मी हेब्बाळकर यांना उडुपी जिल्हा पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यासंबंधी सरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांना बेंगळूर(शहर), डॉ. जी परमेश्वर यांना तुमकूर, एचके पाटील यांना गदग, केएच मुनियप्पा यांना बेंगळूर(ग्रामीण), रामलिंगा रेड्डी यांना रामनगर, केजे जॉर्ज यांना चिक्कमगळूर, एमबी पाटील यांना विजापूर, दिनेश गुंडूराव यांना दक्षिण कन्नड, एचसी महादेवाप्पा यांना मैसूर, प्रियांक खर्गे यांना गुलबर्गा, शिवानंद पाटील यांना हावेरी, बी झेड जमीर अहमदखान यांना विजयनगर, शरणबसप्पा दर्शनापूर यांना यादगिरी, ईश्वर खंड्रे यांना बिदर, एन चलूवनारायणस्वामी मंड्या, एसएस मल्लिकार्जुन यांना दावणगेरे, संतोष लाड यांना धारवाड, डॉ शरण प्रकाश पाटील यांना रायचूर, आर बी तीम्मापूर यांना बागलकोट, के व्यंकटेश चामराजनगर, तंगडगी शिवराज संगप्पा यांना कोप्पळ, डी सुधाकर यांना चित्रदुर्ग, बी नागेंद्र यांना बळ्ळारी, के एन राजन्ना यांना हसन, बी एस सुरेश यांना कोलार, मंकाळ वैद्य यांना उत्तर कन्नड, मधू बंगारप्पा यांना शिमोगा, डॉ. एम सी सुधाकर यांना चिक्कबळ्ळापूर तर एन एस भोसराजू यांना कोडगू जिल्हा पालकमंत्री पद देण्यात आले आहे.