सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात सेवा बजावणार्याच्या मुलीने गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या दहावी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली आहे. सौंदत्ती येथील कुमारेश्वर माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी अनुपमा श्रीशैल हिरेहोळी हिने दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 625 गुण (१००%) घेऊन राज्यातच प्रथम आली आहे. विद्या हि श्रीमंती पाहून येत नसून ज्याच्याकडे चैतन्य, जिद्द, प्रयत्न व कुशाग्र बुद्धीमत्ता असते त्याला ती प्रसन्न होते. साधारण गरीब कुटूंबातील मुलीने दहावीच्या परीक्षेत साधलेले उत्तुंग यश ईतर विद्यार्थ्यांना आदर्शवतच ठरले आहे. अनुपमाने आयएएस होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.सौंदत्ती येथील श्रीशैल हिरेहोळी साधारण गरीब कुटूंबात अनुपमाचा जन्म झाला. तिचे वडिल श्रीशैल हिरेहोळी हे सौंदत्ती येल्लम्मा मंदिराचे सेवेकरी होते. गेल्याच वर्षी तिच्या वडिलाचें तीव्र आजाराने निधन झाले तर आई हि सौंदत्ती येथील एमएमजोशी ईस्पितळात सेवा बजावत आहे.
अनुपमाने प्राप्त केलेल्या यशाबद्दल संपूर्ण सौंदत्ती शहरासह तालुक्यात तिचा अभिमान गावकऱ्यांना आहे. ग्रामीण भागात सोई सुविधांचा अभाव असतांना कोणतेहि पोषक वातावरण विद्यार्थ्यांना मिळत नाही. तरीही संघर्षाची लढाई करीत अनुपमाने मिळविलेले घवघवीत यश हे आईसह नातेवाईकांना आकाशा ईतका आनंद देत आहे.
मला आ.ए.एस व्हायचे आहे
अनुपमा हि पुढे विज्ञान विभागात प्रवेश घेणार असून आएएएस परीक्षा संपादन करण्याची जिद्द उराशी बाळगून ती पुढील वाटचाल करणार असल्याचे तिने बोलून दाखवले. या पुढे हि अधिक जिद्दिने व श्रमाने अभ्यास करणार असल्याचे तिने सांगितले.