क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीने प्यास फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत स्केटींगपटूंनी पाण्याचे महत्व सांगून त्याचा प्रसार करण्यात आला.
मनपा रोटरी जलतरण तलाव गोवावेस ते सोमवारपेठ टिळकवाडी साईबाबा मंदिरापर्यंत काढण्यात आली. 4 ते 20 वर्षे वयोगटातील सुमारे 200 स्केटिंगपटूंनी रॅलीत भाग घेतला होता. पाणी वाचवा जीव वाचवा, जल है तो कल है, पाणी बचाओ जीवन बचाओ भूमी या जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली.
डॉ. माधव प्रभू अध्यक्ष प्यास फाउंडेशन, जी.टी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिनकर अमीन, श्रीधन मलिक, गणेश गुंडप, राजू माळवदे, माजी फेड जायंट्स इंटरनॅशनल अध्यक्ष, अभिमन्यू डागा, तानाजी शिंदे, एम. गंगाधर, महेश आंब्रोळे, अजित तडकोळ, प्रवीण त्रिवेदी, श्रीधर भस्मे, विजय खोत, सूर्यकांत हिंडलगेकर, राहुल ठक्कर व ईशा फाउंडेशन, सद्गुरू पालक आणि स्केटिंगपटू मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रॅली यशस्वीरित्या संपल्यानंतर सर्व सहभागींना डॉ. माधव प्रभू, राजू माळवदे, श्रीधन मलिक, अभिमन्यू डागा यांच्या हस्ते कौतुक प्रमाणपत्र देण्यात आले. ही रॅली यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, शुभम साखे, सागर चौगुले, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सतीश पाटील, साई समर्थ, अंजना, चिन्मय देसाई, नितीन कुदळे यांनी परिश्रम घेतले.