बांदा प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे आज डेगवे येथे क्रांतिदिनानिमीत्त क्रांतिकारक केशव गोविंद गवस देसाई व देवु नाईक हळदणकर यांनाज्या जागेत फाशी दिली होती म्हणजेच काजार्याच्या वृक्ष स्मृतीला भेट देत अभिवादन केले व त्यांना मानवंदना दिल्या. खऱ्या अर्थाने कोकणातून आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या दोन क्रांतिकारकांनी इंग्रज राजवटीला नामोहरम केले. त्यांच्या आठवणी जागवणे आणि नव्या पिढीसमोर हा इतिहास क्रांती दिनाच्या निमित्ताने उजेडात आणावा या हेतूने आज आगळ्यावेगळ्या पद्धतीने क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद तर्फे डेगवे येथील श्री देव धापेश्वर देवस्थान मंदिर जवळ केशव गवस देसाई यांच्या स्मृती जागवण्यासाठी तेथे असलेल्या फलक तर शहीद क्रांतिकारक देवु हळदणकर नाईक यांच्या स्मृती काजार्याचे वृक्ष या ठिकाणी फाशी दिली त्या ठिकाणी असलेल्या फलकाला इतिहासकार कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष प्रा . जी. ए. बुवा व सरपंच राजन देसाई आणि कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे ,सहसचिव राजू तावडे ,माजी तालुकाध्यक्ष सुभाष गोवेकर, प्रा. रुपेश पाटील, रामदास पारकर, स्वातंत्र्य सैनिक साहित्यिक एस. आर . सावंत, बांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डी. बी. वारंग , माजी सरपंच मधुकर देसाई, प्रवीण देसाई राजेश देसाई, उत्तम देसाई, भरत देसाई ,लाडोबा देसाई, श्री फणसीकर आदी उपस्थित होते .