Sawantwadi Taluka Executive Committee of Human Right Association for Protection announced
मोहीनी मडगांवकर यांची कार्याध्यक्षपदी आणि तन्नवीर खतीब तालुका अध्यक्षपदी तसेच सचिव पदी ॲड संदीप चांदेकर, उपाध्यक्ष सोहम शारबिंद्रे यांची निवड
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.माजी अध्यक्ष सौ.मोहीनी मडगांवकर यांची कार्याध्यक्षपदी आणि तन्नवीर खतीब यांची सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून ॲड.संदीप चांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मंदार काणे जिल्हा महिला संघटक सौ.शिवानी पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती.या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात येऊन ती राज्य कार्यकारिणीकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आली होती.राज्य संघटनेच्या मंजूरीनंतर सावंतवाडी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्याची नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे- कार्याध्यक्ष- सौ.मोहीनी मडगांवकर , तालुका अध्यक्षपदी- तन्नवीर खतीब तर उपाध्यक्ष - सोहम शारबिंद्रे आणि सचिव म्हणून ॲड.संदीप चांदेकर तसेच संघटक म्हणून ॲड.अश्रफ शेख आणि महिला संघटक म्हणून सौ.अवंती पंडित, जनसंपर्क अधिकारी म्हणून अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी