मुंबई
पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण समितीची बैठक होत असून यामध्ये रेपो दरात वाढ केली जाणार नसल्याचा अंदाज स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांनी वर्तवला आहे. पुढील आठवड्यात 3 ते 6 एप्रिल यादरम्यान रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक होत असून दोन दिवस चर्चा व 6 तारखेला रेपोदराबाबतचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. फेब्रुवारीत 0.25 टक्के इतकी रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.