ऑनलाईन टीम/तरुण भारत
दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळलं होतं. त्यानुसार ‘ईडी’ने अटकेची कारवाई केली होती. यांनतर मालिकांनी सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. यांनतर आता सुप्रीम कोर्टाने मालिकांना मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने (supreme court) या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. (SC rejects bail plea of minister Nawab Malik in money laundering case)
सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. महत्वाचं म्हणजे नवाब मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली होती. मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांच्या युक्तिवादाची नोंद घेऊन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केलं होतं.