प्रतिनिधी/ बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूलमध्ये श्रीयांश गांधी, बेळगाव परिवारतर्फे शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीयांश गांधी, मंजू देवेंद्र गांधी, पुष्कर ओगले, विजय पाटील उपस्थित होते.
एस. व्ही. भातकांडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. त्यानंतर गांधी परिवारतर्फे शाळेतील गरीब व गरजू 70 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्याचबरोबर 17 विद्यार्थ्यांना शालेय फी भरण्यासाठी रोख रक्कम देण्यात आली. यावेळी पुष्कर ओगले व श्रीयांश गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. सी. वाय. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.