निमरत कौर मुख्य भूमिकेत
हॉटस्टारवर लवकरच ‘स्कूल ऑफ लाइज’ नावाची वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. अत्यंत रहस्यमय असणारा हा ट्रेलर प्रेक्षकांना घाबरविणारा देखील आहे. या सीरिजमध्ये निमरत कौर मुख्य भूमिकेत आहे. निमरत कौर दीर्घकाळानंतर प्रेक्षकांना या सीरिजच्या माध्यमातून भेटणार आहे. एका हॉस्टेलमध्ये शक्ती साळगावकर नावाचा मुलगा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे या ट्रेलरमध्ये दर्शविण्यात आले आहे. निमरत कौर या सीरिजमध्ये या मुलाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्कूल ऑफ लाइज ही सीरिज 2 जून रोजी हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमधील निमरत कौरचा अभिनय लक्ष वेधून घेत आहे. तसेच या सीरिजमध्ये सोनाली कुलकर्णी देखील मुख्य भूमिकेत आहे. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सध्यातरी गुप्तता बाळगण्यात आली आहे. वरिन रुपानी, दिव्यांश द्विवेदी, आर्यन सिंह अहलावत, हेमंत खेर, पार्थिव शेट्टी, अदरीजा सिन्हा आणि आलेख कपूर हे कलाकार देखील यात दिसून येणार आहेत.