मालवण / प्रतिनिधी–
येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि ७५ आकाशकंदील तिरंगा रंगाच्या ओळीत प्रकाशमान करण्यात आले होते. विहंगम अदभुत दृष्य समस्त मालवणकरांनी आपल्या मोबाईल कैद करताना दिसत होते. कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट करण्यात आली होती.