वार्ताहर/बांदा
गणेश चतुर्थीचा सण म्हटला की, अवघ्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . या सणनिमित्त मुंबई, पुणे, कोल्हापूर, सारख्या महानगरात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. पण तळकोकणातील या सणाची नजाकत काही वेगळीच असून, बाप्पाचे आगमन म्हणजे लहान थोरांचा श्रध्देचा विषय आहे.
तळ कोकणात गणेश उत्सवाची तयारी ही जून महिन्यापासून केली जाते. याच कालावधीत गणेश मूर्तिकार गणेश मूर्ती तयार करण्याचे काम हाती घेतात .
आतातर अवघ्या दोन दिवसावर गणरायाचे आगमन आले असल्याने मुर्तिकरांच्या मुर्तिकामाला वेग आला असल्यामुळे गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरविला जात आहे. तर बाजारपेठाही गजबजलेल्या आहेत. खरेदीसाठी ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत असून , गणेश चतुर्थीसाठीच्या सजावटीच्या सामानाच्या खरेदीला ग्राहक वर्ग मोठी पसंती देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जून नंतर काही प्रमाणात मंदावलेल्या व्यापाराला आता या कालावधीत पुन्हा नवसंजीवनी मिळत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गही सुखावला आहे.