हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क
कोगनोळी : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून बेळगाव येथे सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील टोलनाक्मयावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याप्रसंगी टोलनाक्मयावर कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी मंगळवारी सायंकाळी संपर्क साधला असता, 30 डिसेंबर अखेर हिवाळी अधिवेशन चालू असल्याने अधिवेशन संपेपर्यंत हा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी तऊण भारतशी बोलताना दिली.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन व महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा या पार्श्वभूमीवर रविवारपासूनच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी कोगनोळी टोलनाक्मयावर 25 राखीव पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.