नासातर्फे उच्चशिक्षणासाठी निवड
प्रतिनिधी / बेळगाव
नासातर्फे निवड होऊन उच्च शिक्षणासाठी परदेशात चाललेल्या रोहीन शशांक लेंगडे याचा सोमवारपेठ, मंगळवारपेठ गणेशोत्सव मंडळाने बुधवारी संध्याकाळी विशेष सत्कार केला. आपल्या परिसरातील या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी करून बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे मंडळाने त्याचा सत्कार केला.
मंडळातर्फे किरण गावडे यांनी रोहीनचे अभिनंदन करून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी भारत बागी, शशिकांत खासबाग, सचिन हंगिरगेकर, राजू वर्पे, किरण गवळी, संतोष आंग्रे, विनायक गारडी, अमित आंग्रे, शीतल घवाली, राजू माईन आदी कार्यकर्ते तसेच रोहीनचे आजोबा प्रेमचंद, आजी प्रभा, आई शिल्पा व वडील शशांक लेंगडे उपस्थित होते. सत्काराबद्दल रोहीनने आनंद व्यक्त करून आपल्या पुढील अभ्यासक्रमाची माहिती दिली.