क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित विभागीय माध्यमिक मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीराच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. या संघातील 6 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
शिमोगा येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संत मीरा शाळेच्या स्वरा आंजणकर, प्रियंका पाटील, सलामी आपटो, रेनिवर मोलशोय, प्रेनारुंग मोलशोय, ओरिना वाईराम या खेळाडूंची निवड झाली आहे. या संघासोबत शाळेचे क्रीडाशिक्षक सी. आर. पाटील, गौतम तेजम रवाना होत आहेत.
चिकोडी येथे होणाऱया विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी 17 वर्षाखालील मुलांच्या बेळगाव संघात रोहित मंज्याळकर याची निवड झाली. तसेच नुकत्याच जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक मुलांच्या ऍथलेटिक स्पर्धेत अब्दुल मुल्लाने 80 मी. अडथळा शर्यतीत सुवर्ण पटकाविले. तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक सी. आर. पाटील, नीरज सावंत, मयुरी पिंगट, गौतम तेजम यांचे मार्गदर्शन तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे.