कांदोळी/ वार्ताहर
गोमंतक भंडारी समाजाच्या केंद्रीय कार्यकारी महिला समितीच्या पणजी येथील झालेल्या निवणुकीत अध्यक्षपदी संद्या पालयेकर, सरचिटणीसपदी मेधा परुळेकर यांची तर खजिनदारपदी म्हणून सुमती चोपडेकर याची निवड करण्यात आली. यावेळी इतर सदस्यांचीही निवड करण्यात आली. मेधा परुळेकर यांची सरचिटणीस म्हणून निवड झाल्याबद्दल साळगाव मतदारसंघात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
परुळेकर सध्या बार्देश तालुका महिला भंडारी समाजचे अध्यक्ष म्हणून भरीव काम करीत आहे. तालुक्मयातील विविध भागात बैठका घेऊन महिला वर्गाला सदस्यता मोहिमेत सहभागी करून घेणे, ओबीसीच्या विषयी न्याती बांधवांना समाजासाठी शासकीय पातळीवर असलेल्या योजना बाबत जनजागृती करण्यात यावी संबंधी सतत माहिती पुरवत आहे .
तसेच ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देणे, गरजूंना सहकार्य करणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे, यासाठी भरपूर प्रयत्न करीत आहे.
एवढेच नव्हे तर सालीगाव येथे सुगरण महिला मंडळ व स्वयम् महिला मंडळ यांच्या नेतृत्वाखालील महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
नेरूल व साळगाव पंचायत क्षेत्रातील नुकताच सौ. परुळेकर यांच्या पुढाकाराने लहान मुला मुलीसाठी महत्त्वाचा असा “स्ववर्ण प्राशन डोस” कार्यक्रम मोठय़ा उत्साही वातावरणात घडून आणला होता. या त्यांच्या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले होते.