बेळगाव : 13 व्या साऊथ एशियन बॉडी बिल्डिंग अँड फिजिकल बोर्ड एशियन शरीरसौष्ठव फिजिक्स स्पोर्ट्स, साऊथ एशियन व वर्ल्ड स्पोर्ट्स फिजिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात कर्नाटकाच्या (बेळगाव) 6 शरीरसौष्ठवपटूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये एक महिला शरीरसौष्ठवपटूचा समावेश करण्यात आला आहे. गोवा येथे गोवा शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेतर्फे आयोजित शरीरसौष्ठवपटूंची निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीच्या उद्घाटन प्रसंगी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रेमचंद डिग्रा, सचिव हिरल शेठ, एशियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सचिव चेतन पाठारे, खजिनदार अजित सिद्धन्नावर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या स्पर्धा व निवड चाचणीचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान आशिया, साऊथ आशिया व वर्ल्ड स्पोर्ट्स फिजिक्स या स्पर्धेसाठी भारतीय शरीरसौष्ठव संघाची निवड करण्यात आली. तीन विविध स्पर्धांसाठी भारतीय शरीरसौष्ठव चमूची निवड करण्यात आली. यामध्ये प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), नित्यांनद कोटीयान (उडुपी), किर्ती पाटील (बेळगाव), वेंकटेश ताशिलदार (बेळगाव), प्रवीण कणबरकर (बेळगाव) व रामा एस. (बेंगळूर) यांचा समावेश आहे.
Previous Articleदिशा, आशुतोष यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
Next Article आनंद क्रिकेट अकादमी, सीसीके धारवाड विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.