औंध / प्रतिनिधी :
भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने 21 ते 22 सप्टेंबर या कालावधीत 17 वर्षाखालील फेडरेशन कप राष्ट्रीय स्पर्धा DDA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जसोला, दिल्ली येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी अस्थाई समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या कुस्ती संघाची निवड चाचणी स्पर्धा रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी भिकू पठारे स्टेडियम खराडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे .
निवड चाचणी स्पर्धेला सकाळी 10 वाजता सुरवात होणार आहे. तरी मल्ल प्रशिक्षक आणि कुस्तीशौकीन यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनअस्थाई समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांनी केले आहे.