वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये निफ्टीतील अॅपोलो हॉस्पिटल आणि कोल इंडिया यांचे समभाग हे 3 ते 3 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह अन्य कंपन्यांचे समभागही काही प्रमाणात सकारात्मक कामगिरीत राहिले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 152.12 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.23 टक्क्यांसोबत 65,780.26 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46.10 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 0.24 टक्क्यांसह 19,574.90 वर बंद झाला आहे. यावेळी निफ्टीतील अपोलो हॉस्पिटल आणि कोल इंडियाचे समभाग 3 टक्क्यांनी वधारले तर अल्ट्राटेक सिमेंट, डॉक्टर रे•ाrज लॅब यांचे समभाग हे एक टक्क्यांची घसरण नेंदवत बंद झाले आहेत.
विविध क्षेत्रांच्या कामगिरीचा निर्देशांक पाहिल्यास यामध्ये बँकिंग क्षेत्रात काहीशी घसरण राहिली तर अन्य क्षेत्रांचे निर्देशांक हे तेजीसह बंद झाले आहेत. यामध्ये हेल्थकेअर आणि रिअल इस्टेट यांचे निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारले आहेत. बीएसई मिडकॅप निर्देशांक एक टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.6 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले आहेत.
सेन्सेक्समध्ये सनफार्माचे समभाग हे सर्वाधिक दोन टक्क्यांनी तेजीत राहिले. तर टायटनमध्ये 1.27 टक्के, आयटीसी 1.26 आणि बजाज फायनान्सचे समभाग हे 1.06 टक्क्यांच्या मजबुतीसह बंद झाले. यासह नेस्ले इंडिया, इन्फोसिस, लार्सन अॅण्ड टुब्रो, जेएसडब्लू स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर , टाटा मोर्ट्स, आणि टीसीएस यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
दुसऱ्या बाजूला अल्ट्राटेक सिमेंट 1.46 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. तर मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, विप्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, एशियन पेन्ट्स, पॉवरग्रिड कॉर्प, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत.