सेन्सेक्स 347 तर निफ्टी 99 अंकांनी घसरणीत
मुंबई
: भारतीय भांडवली बाजारात जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे शेअर बाजाराचा प्रवास हा घसरणीचा राहिला आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीसोबत सेन्सेक्स 347 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. तर निफ्टीही 99 पेक्षा अधिक अंकांनी घसरुन बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बुधवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 346.89 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 0.55 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 62,622.24 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 99.45 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.53 टक्क्यांसोबत 18,534.40 वर बंद झाला आहे. यावेळी सुझलॉन एनर्जीचे समभाग 10 टक्क्यांनी सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. निफ्टीमध्ये ओएनजीसीचे समभाग हे सर्वाधिक 3.24 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले.
…या समभागांमध्ये घसरण
बीएसई सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 2.41 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग हे दोन टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. एचडीएफसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग हे 1 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. यासह महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, आयटीसी, पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस, बजाज फायनान्स आणि इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीत राहिले.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये भारती एअरटेलचे समभाग हे सर्वाधिक 4.78 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच टेक महिंद्रा 2.08 टक्क्यांनी, एशियन पेन्ट्स 1.67, सनफार्मा 1.60, टाटा मोर्ट्स 1.47, कोटक महिंद्रा बँक 1.07 आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग हे 0.92 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. तसेच एचसीएल टेक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि विप्रोचे समभाग वधारले आहेत. बँक निफ्टी 0.69 टक्के आणि खासगी बँकेचे समभाग हे 0.5 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत.