सेन्सेक्स 221. तर निफ्टी 68 अंकांनी घसरणीसह बंद : विप्रोचे समभाग 2 टक्क्यांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये मागील चार सत्रांमधील घसरणीचा प्रवास कायम राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये विप्रोसह अन्य कंपन्यांचे समभाग हे नुकसानीत राहिल्याची नोंद केली आहे.
दिगग्ज कपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 221.09 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 0.33 टक्क्यांसह 66,009.15 वर बंद झाले. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 68.10 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 19,674.25 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यात विप्रो आणि डॉक्टर रे•ाrज लॅब यांचे समभाग हे दोन टक्क्यांनी घसरले आहेत. यासह इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकीचे समभाग दोन टक्क्यांपेक्षा अधिकने वाढले आहेत.
सेन्सेक्समध्ये विप्रोचे समभाग हे 2.36 टक्क्यांनी प्रभावीत राहिले होते. यासह एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड कॉर्प, सनफार्मा, अल्ट्राटेक सिमेंट आणि आयटीसी यांचे समभाग हे एक टक्क्यांपेक्षा अधिकने नुकसानीत राहिले. यासह टाटा मोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, भारती एअरटेल, जेएसडब्लू स्टील, टायटन, इन्फोसिस, एचसीएल टेक , एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग घसरले आहेत.
अन्य कंपन्यांचा प्रवास पाहिल्यास याममध्ये सेन्सेक्स इंडसइंड बँक आणि मारुतीचे समभाग हे 2 टक्यांपेक्षा अधिकने वधारले आहेत. यासह स्टेट बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एशियन पेन्ट्स, बजाज फिनसर्व्ह आणि टेक महिंद्रा यांचे समभाग हे 1 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह लार्सन अॅण्ड टुब्रो, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक यांचे समभाग हे तेजीत राहिले.
आठवड्यातील बाजारात मागील सात महिन्यांमध्ये सर्वाधिक नुकसानीत हा आठवडा राहिला आहे. यासह बाजारात मागील तीन आठवड्यातील तेजीचा प्रवास थांबला आहे.यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक हे जवळपास 3 ते 3 टक्क्यांनी कोसळल्याचे दिसून आले. बँक निफ्टीचा निर्देशांक सर्वाधिक प्रभावीत झाला आहे. यामुळे आगामी काळात बाजारात कोणती दिशा निश्चित होणार हे पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.