सलग दुसरे सत्रही प्रभावीत : सेन्सेक्स 223 अंकांनी घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. गुरुवारच्या सत्रात बाजार काहीसा दबावात होता कारण भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरण बैठकीत व्याजदर वाढविणार का नाही यावर काहीसा बाजाराचा प्रवास काहीसा असंतुलीत राहिला आहे. यामध्ये आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. परंतु बाजारातील वातावरण सकारात्मक नसल्याचे दिसून आले.
गुरुवारची स्थिती शुक्रवारच्या सत्रातही कायम राहिले यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 223.01 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.35 टक्क्यांसोबत 62,625.63 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 71.15 अंकांनी घसरुन 0.38 टक्क्यांसोबत निर्देशांक 18,563.40 वर बंद झाला आहे.
या क्षेत्रांची स्थिती
बाजारात क्षेत्रांनुसार परिस्थिती पाहिल्यास यामध्ये कॅपिटल गुड्सचा निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारला आहे. यावेळी एफएमसीजी, आयटी, धातू, आणि ऑईल अॅण्ड गॅस यांचे निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. बीएा&ई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक सपाट होत बंद झाले.
मुख्य कंपन्यांमध्ये एचएएलचे समभाग सहा टक्क्यांनी वधारुन बंद झाले, यासोबतच वोल्टास तीन टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक, एचसीएल टेक , इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, एशियन पेन्ट्स, टीसीएस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, नेस्ले इंडिया, सनफार्मा, भारती एअरटेल आणि मारुती सुझुकीचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.
अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक वधारले आहेत. यासह अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प , लार्सन अॅण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोर्ट्स, बजाज फायनान्स आणि एनटीपीसीचे समभाग तेजीसोबत बंद झाले.
शुक्रवारी बाजारात विक्रीचा दबाव राहिला होता कारण गुंतवणूकदारांमध्ये देशातील महागाई दराच्या आकड्या संदर्भात काळजी लागली होती. यामुळे आगामी काळात बाजार कोणती दिशा निश्चित करणार हे पहावे लागणार असल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.