सेन्सेक्स 194 तर निफ्टीचा निर्देशांक 47 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यातील चौथ्या दिवशीच्या सत्रात गुरुवारी पुन्हा भारतीय भांडवली बाजार नुकसानीसोबत बंद झाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील स्थिती आणि नवीन महिन्याचा प्रारंभ यातून नव्याने गुंतवणूकदारांची होणारी बांधणी या वातावरणात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 193.70 अंकांसोबत 0.31 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 62,428.54 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 46.65 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.25 टक्क्यांसह 18,487.75 वर बंद झाला आहे. यावेळी निफ्टीमधील कोल इंडियाचे समभाग सर्वाधिक 4.66 टक्क्यांनी घसरले आहेत तसेच कोटक महिंद्रा बँकेचे समभाग हे 4.24 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचे समभाग हे सर्वाधिक 3.42 टक्क्यांनी घसरले. यासोबतच आयसीआयसीआय बँक, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक आणि मारुती सुझुकीचे समभाग हे घसरणीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये टाटा मोर्ट्सचे समभाग 1.67 टक्क्यांच्या तेजीसोबत सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. यावेळी हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, सनफार्मा, नेस्ले इंडिया, टीसीएस, विप्रो, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग वधारले आहेत.
या क्षेत्रांची स्थिती
गुरुवारच्या सत्रात भारतीय बाजारात बँक आणि धातू क्षेत्राचा निर्देशांक 0.5 ते 0.5 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. यावेळी आयटी, रियल इस्टेट आणि औषध क्षेत्रांमध्ये 0.5 ते 1 टक्क्यांनी तेजी राहिली होती. बीएसईमधील मिडकॅपचा निर्देशांक जैसे थे तर स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.6 टक्क्यांनी तेजीत राहिला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टाटा मोर्ट्स 535
- हिंदुस्थान युनि 2697
- एशियन पेन्ट्स 3240
- सन फार्मा 987
- टीसीएस 3323
- नेस्ले इंडिया 21889
- विप्रो 407
- बजाज फायनान्स 7040
- अॅक्सिस बँक 919
- इंडसइंड बँक 1291
- स्टेट बँक 582
- टेक महिंद्रा 1120
- एचडीएफसी 2645
- एनटीपीसी 174
- टायटन 2826
- लार्सन अॅण्ड टुब्रो 2209
- टाटा स्टील 105
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1318
- अपोलो हॉस्पिटल 4819
- हिरोमोटो 2800
- अंबुजा सिमेंट 429
- सिप्ला 964
- एसीसी 1801
- कोलगेट 1610
- ल्यूपिन 811
समभाग घसरलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 828
- कोटक महिंद्रा 1928
- आयसीआयसीआय 936
- आयटीसी 439
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2462
- एचडीएफसी बँक 1604
- अल्ट्राटेक सिमेंट 7839
- एचसीएल टेक 1141
- मारुती सुझुकी 9330
- इन्फोसिस 1319
- बजाज फिनसर्व्ह 1450
- पॉवरग्रिड कॉर्प 232
- कोल इंडिया 230
- पीआय इंडस्ट्रीज 3515
- युपीएल 678
- मॅक्स फायनान्स 702