चढउतारांच्या प्रवासात सेन्सेक्स-निफ्टी घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी मोठय़ा घसरणीची नेंद करत बाजार बंद झाला आहे. यामध्ये एफआयआयमधील विक्रीच्या दबावामुळे भारतीय बाजार नुकसानीत राहिला होता. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स तब्बल 631.83 अंकांनी प्रभावीत झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सोमवारच्या मजबूत तेजीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर मंगळवारी 631.83 अंकांनी घसरुन निर्देशांक 60,115.48 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 187.05 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 17,914.15 वर बंद झाला आहे. काहीवेळ सेन्सेक्स 700 अंकांनी नुकसानीत होता.
गुंतवणूकदार घसरलेला डॉलर, चीनमधील निर्बंध उठण्याचे संकेत, घसरत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा फायद्याच्या दरम्यान फेडरल रिझर्व्हकडून मंदी व अन्य चिंताजनक बाबींच्या घटनांमुळे बाजारात मोठय़ा घसरणीची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारच्या सत्रात जवळपास 3 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. बीएसईमधील लिस्टेड सर्व कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य घसरुन 280 लाख कोटी रुपयावर राहिली असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.
बँक-आयटी स्टॉक्स सर्वाधिक घसरणीत
वाहन व हेल्थकेअरच्या व्यतिरिक्त सर्व क्षेत्रांमध्ये विक्री राहीली होती. तर बँक आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण राहिली आहे.
फेडरलची भीती
अमेरिकन केंद्रीय बँक युएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीची चिंता आजही भेडसावत आहे. फेडरलचे अध्यक्ष मॅरी डालय यांनी म्हटले आहे, की केंद्रीय बँक महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही व्याजदर होण्याचे संकेत असून 5 टक्के अधिक ही वाढ होण्याची शक्यता मांडली आहे. अटलांटाचे फेड अध्यक्ष राफेल बोस्टिक यांनी यावेळी म्हटले आहे, दुसऱया तिमाहीच्या प्रारंभी व्याजदरात 5 टक्क्यांनी वधारल्यास व लांब कालावधीपर्यंत तसाच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यांचाही परिणाम हा भारतीय बाजारावर झाला आहे.