वृत्तसंस्था/ पॅरिस
सोमवारी येथे घोषिक करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या एकेरीच्या मानांकन यादीत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पुन्हा अग्रस्थान काबीज केले आहे. जोकोविचने रविवारी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.
35 वर्षीय जोकोविचने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा 10 वेळा जिंकली आहे. तसेच त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवून स्पेनच्या राफेल नदालच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. 2011 च्या जुलैपासून जोकोविचने 374 आठवडे एटीपी क्रमवारीतील आपले अग्रस्थान राखले होते. मेलबर्नमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत जोकोविचने अंतिम सामन्यात ग्रीसच्या सित्सीपेसचा पराभव केला होता.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोविच 7070 गुणासह पहिल्या, स्पेनचा अॅल पॅरेझ 6730 गुणासह दुसऱ्या, ग्रीसचा सित्सीपेस 6195 गुणासह तिसऱ्या, नॉर्वेचा कास्पर ऊड 5765 गुणासह चौथ्या, रशियाचा ऊबलेव्ह 4200 गुणासह पाचव्या, स्पेनचा नदाल 3815 गुणासह सहाव्या, पॅनडाचा अॅलीसीमे 3715 गुणासह सातव्या, अमेरिकेचा टेलर फ्रिझ 3410 गुणासह आठव्या, डेन्मार्कचा ऊने 3046 गुणासह नवव्या आणि पोलंडचा हुरकेझ 2995 गुणासह दहाव्या स्थानावर आहेत.