झोन बदल आणि रस्ता रूंदीवर आक्षेप
मडगाव : मडगावच्या बाह्या विकास आराखड्यात स्थानिक नागरिकांना गंभीर विसंगती आढळून आल्या आहेत. काल स्थानिकांनी झोन बदल आणि रस्त्याच्या ऊंदीच्या संदर्भात 29 आक्षेप नोंदवले आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती सादर केल्या होत्या. त्यांना काल दक्षिण गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाने (एसजीपीडीएने) वैयक्तिक सुनावणीसाठी बोलावले होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना सावियो कुतिन्हो म्हणाले की, मसुद्यात काही मोठ्या त्रुटी आहेत ज्या दुऊस्त करणे आवश्यक आहे. मसुद्यात भरपूर सखल भाग किंवा फळबागांच्या जमिनी वस्ती म्हणून दाखविण्यात आल्या आहेत. प्रस्तावित रिंगरोड आराखड्यात बरोबर दाखवलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एनजीओ ‘गोंयचे फुडले पिळगे खातीर’ ने जानेवारीमध्ये एसजीपीडीएकडे सुमारे 28 आक्षेप नोंदवून निवेदन दाखल केले. ‘गोयचे फुडले पिळगे खातीर’ चे अध्यक्ष जॅक मास्कारेन्हास म्हणाले की, एसजीपीडीएने त्यांना उद्या स्थळ तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ‘आम्ही मागणी करतो की एसजीपीडीए ने या ओडीपी-2031 मसुद्यावरील आमच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करावा आणि तो पूर्णपणे रद्द करावा. संशोधन-आधारित शाश्वत विकासाची योजना उपलब्ध राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली पाहिजे, राज्य दृष्टिकोन योजनेसह आमच्या राज्यासाठी जमीन वापर धोरण तयार करण्यापासून सुऊवात केली पाहिजे,’. एसजीपीडीएने गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी केल्याचा दावा करून, ‘गोंयचे फुडले पिळगे खातीर’ ने खाजगी कंपनी टर्बोस्क्चने मडगाव ओडीपीसाठी तयार केलेल्या नकाशातील प्रमुख कार्टोग्राफिक त्रुटींची निंदा केली, ज्यात शहरातील रस्ते व रेल्वेमार्गाचा समावेश आहे. ‘गोंयच्या फुडल्या पिळगे खातीर’ ने या योजनेच्या एसजीपीडीएचे माजी अध्यक्ष विल्फ्रेड डिसा, रणजीत बोरकर, आर पाऊलो गोम्स आणि प्रकाश एम. नाईक या चारही स्वाक्षरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे जे कमतरता ओळखण्यात अयशस्वी ठरले आहेत.