पुणे / प्रतिनिधी :
Set Exam on 26 March 2023 सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) 26 मार्चला घेण्यात आहे. त्यासाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. विद्यापीठाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदाची 38 वी परीक्षा ही 26 मार्चला घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अधिक वाचा : साखर कारखान्यांनी खासगी काट्यावर वजन केलेला ऊस नाकारल्यास कारवाई
30 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. तर विलंब शुल्कासहित 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी संकेस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सेट विभागातर्फे करण्यात आले.