नाय पी दाव / वृत्तसंस्था
म्यानमारमधील लष्करी सरकारने बुधवारी 7 हजार 012 हून अधिक कैद्यांची सुटका केली. लष्कराचे जनरल आणि माहिती उपमंत्री जो मिन तुन यांनी ही माहिती दिली. म्यानमार 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर कैद्यांची ही मुक्तता करण्यात आली आहे. 31 जानेवारी 2021 रोजी लष्कराने देशात सत्तापालट केला होता. यानंतर लोकशाही समर्थक नेत्या आंग सान स्यू की यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. अलीकडेच स्यू की यांची शिक्षा 7 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. आता त्यांची एकूण शिक्षा 33 वर्षे झाली आहे.