प्रतिनिधी/ पणजी
युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयिताला ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या विरोधात 376 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे नाव इर्फान लाद्दुफिर असे असून तो चिंबल इंदिरानगर येथील आहे. संशयित आणि पीडित युवती एकमेकांच्या ओळखीची होती नंतर त्यांची मैत्री झाली. संशयिताने पीडित युवतीशी प्रेमाचे नाटक करून तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि गेल्या काही महिन्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे सुऊ केले. नंतर काही दिवसांनी पीडित युवतीने लग्न करण्याबाबत विचारले असता संशयित तिला टाळण्याचा प्रयत्न करू लागला व पीडित युवतीला धमकावू लागला त्यामुळे तिने ओल्ड गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. ओल्ड गोवा पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयिताला अटक केली. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत