क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बॉडीपॉवर व्यायामशाळा आयोजित मि. बॉडीपॉवर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत शाहाबाज याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. बॉडीपॉवर क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. तर ईमाद महालदार याने उत्कृष्ट पोझरचे बक्षिस पटकाविले.
बॉडीपॉवर व्यायामशाळेच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेत 45 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून अंजूमन इस्लामचे अध्यक्ष राजू शेट, इजाज हकिम, युसूफ तोलगी, सोफियन तोलगी, जहिर अब्बाज, जिशान तोलगी व समीर मालाइ, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम. के. गुरव, सचिव एम. गंगाधर, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनिल पवार, सुनिल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल – 55 किलो गट 1) इसमाईल नाईक 2) मोईन खान 3) आशिष मुल्ला 4) इंजमाम गोरी 5) आयान देसाई, 60 किलो गट 1) शाहाबज 2) तौसिब खान 3) आरेस नुडली 4) अमिन जाबाजपुरी, 65 किलो गट
1) अर्झान 2) प्रेम 3) शाकिब खान 4) दस्तगिर मुझावर 5) सोहेल मुझावर, 65 किलो वरील गट 1) अरबाज अंकलगी 2) फैजुल्ला 3) जमाद मालदार 4) सैफ कित्तुर 5) सर्फराज मकानदार यांनी विजेतेपद पटकाविले. मि. बॉडीपॉवर क्लासिक किताबासाठी इस्माईक नाईक, अरबाज अंकलगी, शाहाबाज व अर्झान यांच्यात लढत झाली. त्यामध्ये शाहाबाजने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. बॉडीपॉवर क्लासिक हा किताब पटकाविला तर उत्कृष्ट पोझर म्हणून ईमाद महालदारने किताब पटकाविला. त्यांना पाहुण्याच्या हस्ते चषक व रोखरक्कम देण्यात आली.पंच म्हणून एम. के. गुरव, एम. गंगाधर, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनिल पवार यांनी काम पाहिले.