तरुणभारत ऑनलाइन टीम
अभिनेता आयुषमान खुराना शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे बॉलीवूड किंगखान हा त्याचा आदर्श आहे.आयुष्मानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली, तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये सुत्रसंचलन करताना दिसला आहे. आणि त्यानंतर त्याला 2012 मध्ये विक्की डोनर चित्रपटामध्ये मोठा ब्रेक मिळाला.आयुष्मानने अलीकडेच बॉलीवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलीवूड बबल च्या वृत्तानुसार आयुषमानच्या पत्रकारितेच्या शिक्षणाची प्रेरणा ही शाहरुखकडून मिळाली असं तो सांगतो.
शाहरुख हा उत्तरेकडून आला आहे. त्याला कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नाही तरीही तो सुपरस्टार, मेगास्टार झाला. त्यानेही टीव्हीपासून सुरुवात केली होती. त्याचाच आदर्श घेऊन मी पत्रकारिता शिकलो.मी त्याला अजूनही फॉलो करतो. त्याच्यामुळे मी जनसंवाद सुरू केला आणि त्याच्यामुळे मी माझा अभ्यास गांभीर्याने घेतला आहे.”असं आयुषमानने बॉलीवूड बबलला सांगितले आहे. दरम्यान, आयुषमानचा अनिक, डॉक्टर जी आणि अॅक्शन हिरो हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत .