दलित संघटनेतर्फे वर्षभर कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
विविध दलित संघटनांच्यावतीने शुक्रवारी आंबेडकर उद्यानात शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी राजषी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी प्रा. के. डी मंत्रेशी म्हणाले, शाहू महाराजांच्या काळात 500 हून अधिक संस्थाने होती. शाहू महाराजांनी समाज जीवनाशी एकरूप होऊन समाजात शिक्षणाची गंगोत्री आणली. याबरोबरच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. त्यामुळेच शिक्षणाचा प्रसार वाढला, असे सांगितले. यावेळी मल्लेश कुरंगी, यल्लाप्पा कोलकार, जीवन कुरणे, प्रसाद कांबळे, अर्जुन देमट्टी, एम. आर. कलपत्री, सुधीर चौगुले यांच्यासह दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.