ऑनलाईन टीम/तरुण भारत
प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबतात मात्र यातील काही मार्ग लोकांच्या नजरेसमोर आले तर मात्र त्याचा प्रसाद ही मिळतो असाच प्रकार सातारा शहरात एका युवकाच्या चांगला अंगलट आला. बुरखा घालून आला प्रेयसीला भेटायला गेला अन् मुलं चोरणारा व्यक्ती समजून नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला आहे.
दरम्यान, साताऱ्यातील तामजाईनगर येथे एक युवक बुरखा घालून प्रियसीला भेटायला आला हाेता. हा युवक मुलं चोरणारा असल्याचा संशय लोकांना आला. त्यामुळे त्यांनी त्याला चोप दिला. त्यानंतर त्याला शाहपूरी पाेलीसांनी पाेलीसांच्या स्वाधीन केले. पाेलीसांनी (shahupuri police) युवकास (youth) ताब्यात घेऊन त्याची चाैकशी केल्यानंतर खरा प्रकार समाेर आला.
सुरवातीला पोलिसांनी त्याची चाैकशी केली. प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. परंतु त्याला पाेलीसी खाक्या दाखवताच तो प्रेयसीला भेटायला आल्याचे सांगितलं. प्रेयसी आणि तिचा हा प्रियकर दोघेही विवाहित आहेत. प्रियसीला भेटण्यासाठी वेश बदलून येणे या प्रियकराला चांगलेच महागात पडले.