अफेयरच्या वृत्तांदरम्यान छायाचित्र व्हायरल
हॉलिवूड गायिका शकीराने दीर्घकालीन जोडीदार जेरार्ड पीकपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला होता. परंतु लोकप्रिय गायिका आता स्वत:चा भूतकाळ बाजूला सारून वाटचाल करताना दिसून येत आहे, कारण तिला अलिकडेच टॉम क्रूझसोबत पाहिले गेले आहे. एका क्रीडास्पर्धेदरम्यान दोघेही एकत्र दिसून आले आहेत. दोघांदरम्यान उत्तम केमिस्ट्री दिसून आल्याचे बोलले जात आहे.
एका चाहत्याने शकीरा अन् टॉम क्रूज यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ तयार केला आहे. तसेच या दोघांची छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार टॉम क्रूझ शकीरावर प्रेम करू लागलाय. शकीराचे मन जिंकण्यासाठी टॉम प्रयत्नशील असल्याचेही काही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
एका दशकापेक्षा अधिक काळापर्यंत एकत्र राहिल्यावर शकीरा आणि जेरार्ड पीकने जून 2022 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पीक सध्या क्लारा चिया मार्टीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. शकीरा आणि पीक या दोघांना दोन मुले आहेत. स्वत:चे नाते समाप्त केल्यावरही दोघेही मुलांचे पालनपोषण एकत्रितपणे करत आहेत.