Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आल्य़ाची घोषणा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत केली. या निर्णयानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेला उधान आलं. दरम्यान,विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारे पत्रक काढले आहे.आदरणीय पवार साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करत अजित पवार यांनी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
काय म्हटलयं पत्रकात
आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास नवनिर्वाचीत पदाधिकारी सार्थ ठरवतील अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पादाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे,खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.