कुंडलः प्रशांत गायकवाड
देशातील कोणत्याही भागात जा या भागातील लोक सन्मानाने रहात असलेचे दिसते ही सन्मानाने जगण्याची प्रेरणा क्रांतिअग्रणी जी.डी.बापूंसारख्या (G.D. Laad) माणसांनी दिली असून स्वातंत्र्य व स्वातंत्र्यानंतर च्या काळातील त्यांचे काम प्रेरणादायी होते असे प्रातिपादन राष्ट्र्वादी पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवार ( Sharad Pawar ) यांनी केले ते कुंडल (पलूस) येथे क्रांतिअग्रणी डाॕ.डी.डी.बापू लाड जन्मशताब्दी सांगता समारंभ, समाधीस्थळ लोकार्पण व क्रांतिदर्शी जन्मशताब्दी स्मृतीअंकाचे प्रकाशन व कारखान्याच्या विस्तारीत गाळप हंगाम शुभारंभ अश्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष,आमदार मानसिंगराव नाईक,आमदार विश्वजित कदम, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार शिवाजीराव नाईक,युवा नेते प्रतिक पाटील, रोहित आर.आर. पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी खा. शरद पवार,यांचे हस्ते क्रांतिअग्रणी डाॕ. जी.डी.बापू लाड यांच्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण आ.विश्वजित कदम, आ.जयंत पाटील आदीसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.तसेच क्रांतिदर्षी या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
खा.पवार पुढे म्हणाले बापूंनी सर्वसामान्य नागरीकांच्या जिवनातील अंधार दुर झाला पाहिजे हे स्वप्न पाहिले होते अन हे स्वप्न पुर्ण करणेसाठीच त्यांनी क्रांती कारखान्याची उभारणी केली. हे क्रांतीस मिळणार्या देशपातळीवरील विवीध पुरस्काराने सिद्ध होते. देशात या जिल्ह्यातील कारखान्यांचा जो सन्मान होतो यामध्ये अग्रक्रमाने क्रांती व सोनहिरा अग्रभागी आहेत. प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील, आ.विश्वजित कदम, खा. संजयकाका पाटील यांनी क्रांतिअग्रणी बापूंच्या कार्यांचा एक गौरवशाली इतिहास असा उल्लेख आपल्या भाषणात केला. आ.अरुण लाड यांनी जन्मशताब्दी व क्रांतीअग्रणींच्या समाधीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याविषयी सांगितले.