मुंबई
निधी उभारणीबाबत गुरुवारी बैठक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अपार इंडस्ट्रिजचा समभाग बाजारात चढउतार असताना मात्र तेजीत असताना दिसला. सदरचा कंपनीचा समभाग मंगळवारी 7 टक्के इतका बीएसईवर इंट्रा डे दरम्यान वाढत 5801 रुपयांवर पोहचला होता. 28 सप्टेंबरला संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे, ज्यात निधी उभारणीचा विषय मंजूर होण्याची चिन्हे आहेत.